
पुणे-आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील जलतरणात रूपांतर झालेल्या रस्त्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी भल्या पहाटे अचानक पाहणी दौरा केला. माण, मारुंजी आणि हिंजवडी परिसरातील नाले, ओढ्यांवर झालेली अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्या लोकांनी शासकीय रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण केला आहे, अशा लोकांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह अडवणारी अनधिकृत बांधकामे पुढील आठ दिवसांत बुलडोझर लावून जमीनदोस्त करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी झालेल्या आढावा बैठकीनंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “हिंजवडी परिसरातील पावसाळ्यातील जलसाठ्याचा मुख्य कारण म्हणजे ओढ्यांवर झालेली अनधिकृत अडथळे आणि अतिक्रमण. हे अतिक्रमण काढून टाकल्