



पंढरपूर हुन संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदी कडे परतीच्या प्रवास निघाला असून रात्री वाल्हे येथे सोहळ्याचा मुक्काम होता.
हा मुक्काम उरकून पहाटे साडे सहा वाजता माईंचा पालखी सोहळ्याचे जेजुरीत आगमन झाले.
राष्ट्रीय संत काशिनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्ट व जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
सकाळी विठ्ठल मंदिरात माऊलीच्या पादुंकावर महापूजा,अभिषेक घालण्यात आला.
जेजुरी येथे दुपारी जेवण झाल्या नंतर माऊलींचा सोहळा संत सोपान काकांच्या सासवड नगरीत मुक्कामासाठी निघणार आहे