विदेशी दारू चोरीप्रकरणी आरोपीचा पर्दाफाश!काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई – २४ तासांत १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sandhya

पुणे – काळेपडळ तपास पथकाने धडाकेबाज कामगिरी करत नॅशनल वाईन शॉपमधून विदेशी दारू चोरी करणाऱ्या १९ वर्षीय चोरट्याला केवळ २४ तासांत गजाआड केले. आरोपीकडून १.३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक १४ जुलै २०२५ रोजी दाखल गुन्हा रजि. नं. २७०/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(४) नुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात काळेपडळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, लावण्य हॉटेलजवळील नाल्याजवळ एक इसम संशयास्पदरीत्या थांबलेला आहे.

पोलिसांनी तात्काळ धाव घेत संशयित इसम अर्पित सुनिल अंधारे (वय १९, रा. कोंढवा बु.) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोपेड गाडी (MH 12 VR 5808) ची डिक्की तपासल्यावर त्यामध्ये विदेशी दारूच्या बाटल्या व कटर मशीन आढळले. अधिक चौकशीत आरोपीने कबुली दिली की, त्याने बीबीसी चौकातील नॅशनल वाईन शॉपमधून सदर वस्तू चोरी केल्या आहेत.

पोलिसांनी आरोपीकडून महागड्या दारूच्या बाटल्या, कटर मशीन व रोख रक्कम मिळून सुमारे ₹१,३०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ श्री. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोनि. अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या कारवाईत एपीआय अमित शेटे, पो.ह. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले आणि प्रदीप बेडीस्कर या तपास पथकाने मोलाची भूमिका बजावली.

Leave a Comment

You cannot copy content of this page