कोलवडी- मांजरी खुर्द वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण लवकर न झाल्यास कोलवडीकरांचा आंदोलनाचा इशारा…

Photo of author

By Sandhya

वाघोली प्रतिनिधी :
कोलवडी-साष्टे मार्गे मांजरी खुर्द,मांजरी बुद्रुक पुढे हडपसर शहराकडे हा रस्ता जातो.ग्रामीण भागापासून शहरी भागाला जोडणारा महत्वपूर्ण वर्दळीचा रस्ता म्हणून या रस्त्याला महत्व प्राप्त झाले आहे. परंतु सद्यस्थितीत या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे अतिशय दुरवस्था झाली आहे.तसेच हा रस्ता पूर्वीपासून पूर्णपणे अरुंद असल्याने येथे दोन चारचाकी वाहने बसने अवघड होत असल्याने येथे अतिशय अरुंद व दुरवस्थेतील रस्त्यांमुळे या मार्गावर दररोज अपघात घडत आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक वाढले असून अनेकांना या रस्त्यावर आपले जीव गमवावे लागले आहेत.कोलवडी, मांजरी खुर्द ही गावे महानगर पालिकेच्या शेजारी असून लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढली आहे.त्यामुळे शासनाने,संबंधित बांधकाम खात्याने कोलवडी-मांजरी वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण त्वरित करण्याची मागणी कोलवडी गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड यांनी शासन स्तरावरील सबंधित खाते व बांधकाम विभागाकडे वेळोवेळी केली आहे.
तसेच या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी व शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे.त्यामुळे या रस्त्याकडे लवकरात लवकर संबंधित रस्ते बांधकाम खात्याने लक्ष घालून योग्य तो मार्ग काढणे गरजेचे असल्याचे कोलवडी व मांजरी ग्रामस्थामध्ये चर्चा होत आहे. या मार्गाने अष्टविनायका पैकी एक,असलेल्या थेऊर चिंतामणी धार्मिक स्थळाकडे जाणारे भाविक भक्त, प्रवास करणारे नागरिक,वाहन चालक अक्षरशः वैतागले असून जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करीत आहे.त्यामुळे कोलवडी-मांजरी खुर्द रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण त्वरित व्हावेत यासाठी कोलवडी व मांजरी खुर्द या दोन्ही गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत.
दळणवळण व वर्दळीच्या दृष्टीने कोलवडी-मांजरी रस्ता मार्ग आता महत्त्वपूर्ण झाला असून त्यामुळे अनेक वर्षापासून या रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण होण्याचे काम रखडले आहे.जर यापुढे शासनाने किंवा सबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही तर यापुढे कोलवडी गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड,कृ.उ.बा.स.संचालक शशिकांत गायकवाड,उपसरपंच संदिप गायकवाड,माजी उपसरपंच विकास कांचन,माजी उपसरपंच व ग्रा. सदस्य रमेश मदने,माजी उपसरपंच नानासाहेब भाडळे,ग्रा. सदस्य सचिन गायकवाड,ग्रा. सदस्य योगेश मुरकुटे,युवा उद्योजक संतोष मुरकुटे,युवा उद्योजक रवींद्र गायकवाड,उद्योजक अजित कदम आदींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे सरपंच गायकवाड यांनी सांगितले.


कोलवडी परिसरात लोकवस्ती झापाट्याने वाढून अनेक समस्या निर्माण होत आहे.यामध्ये महत्वाची समस्या ही रस्त्याची असून याचं रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण त्वरित झाले पाहिजेत.त्यासाठी आम्ही आता गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत.

  • विकास कांचन,माजी उपसरपंच-कोलवडी,साष्टे


कोलवडी-मांजरी रस्त्याच्या रुंदीकरण व नूतनीकरण त्यावर बजेट टाकले होते,मागे या रस्त्याची मोजणी करून सर्व्हे केला होता.त्यानंतर रुंदीकरण करण्यासाठी हा विषय भूमी अभिलेख ला टाकले आहे.बरेच वर्ष झाले या रस्त्याचे डांबरीकरनाचे काम रखडले आहे. ते पूर्ण करण्याचा व रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

  • अश्विनी तांदळे,सबंधित अधिकारी,बांधकाम खाते,कोलवडी-मांजरी रस्ता.

Leave a Comment

You cannot copy content of this page