


पुणे -गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धरणांमधून वाढलेल्या विसर्गामुळे पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. परिणामी, नदीपात्रालगतचे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहे.
पाणीपातळी वाढल्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणे धोकादायक ठरू शकते, म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या परिसरात सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आज दुपारी १ वाजता धरणातून २५,६९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणेकरांनी अनावश्यकपणे नदीकाठी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.