

मंचर : काही वर्षापूर्वी बँकांमध्ये घोटाळे झाले, अनेक लोक मोठ्या रकमा घेऊन देशसोडुन पळाले.त्यामुळे खाजगी, सहकारी बँकांवर रिझर्व बँकेने निर्बंध घातले असून रिझर्व बँकेच्या निर्बंधाखाली सर्व बँकांना काम करावे लागते.जर बँकांनी व्यवस्थित काम केले नाही तर रिझर्व बँक त्या बँकेचे विलीनीकरण करते.त्यामुळे बँकांनी चांगल्या पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.असे मत माजी ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवार दि.३ रोजी व्यक्त केले.
मंचर येथील शरद सहकारी बँकेची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कवियत्री शांता शेळके सभागृहात संपन्न झाली.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी शरद बँकेचे अध्यक्षस्थानी देवेंद्रशेठ शहा होते.यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,अतुल बेनके,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील,बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील,अनुसया पतसंस्थेच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील,ज्येष्ठ नेते पांडुरंग पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात,शेतमालचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील,अनिल वाळूंज,सागर काजळे, डॉ.ताराचंद कराळे,गणेशभाऊ कोकणे,सोपानराव नवले,अजय घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह बँकेचे संचालक,सभासद आणि विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. माजी ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले शरद सहकारी बँकेचे काम उत्तम असून बँकेने मोठी कर्ज देण्यापेक्षा छोटी छोटी कर्ज देऊन व्यावसायिकांना उभे करावे.शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले शरद सहकारी बँकेचे काम पूर्वीपासून चांगल्या पद्धतीने सुरू आहे.बँकेत कर्ज मागणी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने सर्व माहिती देऊन सर्व पडताळणी करूनच कर्ज दिले जाते.कर्जात कुणालाही सूट दिली जात नाही.बँकेचे पैसे बुडत असतील तर ते मला सहन होत नाही.त्यामुळे बँकेत राजकारण चालत नाही.वार्षिक सर्वसाधारण सभेत रमेशशेठ येवले,देवदत्त निकम,प्रभाकर बांगर,नंदकुमार बोऱ्हाडे,सोपानराव शिंदे,दादाभाऊ पोखरकर,रमेश खिलारी,गणेश यादव,रवींद्र वळसे पाटील, यतीनकुमार हुले,पुनम वाघ,अथर्व कोकणे,सुरेश गायकवाड, राजू थोरात,लक्ष्मण थोरात आदी मान्यवरांनी भाग घेतला. यावेळी शरद बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड,निवृत्ती अभंग,लक्ष्मण काळे,विजयकुमार शिंदे इत्यादींनी बँकिंग क्षेत्रातील नियम आणि जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.गुणवंत विद्यार्थी आणि नवनिर्वाचित अधिकार्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन निलेश पडवळ,आभार शिवाजीराव लोंढे यांनी मानले.