


मंचर-भीमाशंकर हायवेवर चिंचपूरमळा परिसरात सोमवारी सकाळच्या साडेदहा ते अकरा च्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजय आढळराव (वय अंदाजे 32) यांचा जागीच मृत्यू झाला असून, प्रतीक कोरके हा तरुण जखमी झाला आहे.ही दुर्घटना मंचर गावच्या पुढे आणि मंचर बायपास चौकाच्या अलीकडे चिंचपूर मळा येथे घडली. बजाज पल्सर आणि यामाहा या दोन दुचाकी आणि सुझुकी कंपनीची ईको चारचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की पल्सर दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली.आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अजय आढळराव आणि प्रतीक कोरके हे दोघेही आपापल्या दुचाकीवरून मंचरहून घोडेगावच्या दिशेने निघाले होते. चिंचपूर मळा येथे समोरून आलेली सुझुकी ईको गाडी आणि दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली.
या अपघातात अजय मनोहर आढळराव यांचा गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला, तर प्रतीक कोरके जखमी असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.