
आंबेगाव रक्षाबंधन या पवित्र आणि प्रेमळ नात्याच्या दिवशी, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी आज भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून बहिणींची गर्दी कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानी उसळली होती.पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बहिणींनी ओवाळणीच्या ताटात अक्षता, फुलं, नारळ आणि राखी घेऊन, उत्साहाने मंत्री भरणे यांच्या मनगटावर राखी बांधली. या राखीबरोबर बहिणींनी भरणे यांच्या साठी दीर्घायुष्याच्या आणि यशस्वी कारकिर्दीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान ‘रेकॉर्ड ब्रेक’ इतक्या संख्येने राख्या त्यांच्या हातावर बांधल्या गेल्या, हे विशेष आकर्षण ठरले.कार्यक्रमादरम्यान अनेक बहिणींनी सांगितले की, मंत्री दत्तात्रय भरणे हे नेहमीच महिलांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी पुढाकार घेणारे आहेत. महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य लक्षवेधी असून, त्यांच्या मदतीमुळे अनेक बहिणींना आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाला आहे.स्वतः कृषिमंत्री भरणे यांनी बहिणींनी दाखवलेल्या प्रेम आणि स्नेहाबद्दल मनापासून आभार मानत सांगितले, “महिलांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि सुरक्षितता हे माझे ध्येय आहे. बहिणींचा आशीर्वाद हीच माझी खरी ताकद असून, त्यांच्या आनंदासाठी आणि प्रगतीसाठी मी सदैव तत्पर राहीन.या सोहळ्यात लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमुळे आणि प्रेमामुळे हा रक्षाबंधनाचा दिवस मंत्री भरणे यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला.