
भरवस्तीतील सकाळी ही पाच मजली इमारत पाडण्यात आली.
सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.
जेजुरी शहरातील खोमणे आळीतील बांधकामाधीन इमारत सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धोकादायकरीत्या झुकली होती . जेजुरी नगरपरिषदने अग्निशमन दल व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली.पोलिसांची तातडीची घटनास्थळी घाव घेवून रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर केले. सुरक्षा बरिकेट लावून रहदारी थांबविण्यात आली.
जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळी परिसरात रविवारी (दि. 10 ऑगस्ट 2025) सायंकाळी अंदाजे 5 वाजता बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत अचानक एका बाजूला धोकादायकरीत्या झुकल्याने परिसरात खळबळ उडाली. वेळीच घेतलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व नगर परिषदेचे आधिकरी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन इमारतीभोवतालचा परिसर तात्काळ बंद करण्यात आला तसेच शेजारील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.
पहाटे पुणे महानगर पालिकेचे कटर्स दाखल झाले .सकाळी आठ वाजता इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आणि क्षणार्धात पाच मजली इमारत खाली कोसळली.
प्राथमिक माहितीनुसार, इमारत झुकण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पथक कार्यरत असून, नेमके कारण तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वाढत्या शहरांमध्ये बांधकामादरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.
सदर इमारत अनधिकृत पने बांधली जात होती. सदर इमारत मालकास जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने यापूर्वीच नोटीस दिली होती. आणखी अनेक इमारती अनधिकृत पने बांधण्यात येत असून त्यांनाही पालिकेने नोटिसा दिल्या आहेत.आता या इमारतींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे व कर्मचारी वर्गाने इमारत झुकल्या पासून ते इमारत पाडून मलबा हटविण्या पर्यंत चोख बंदोबस्त दिला.