


जेजुरी पोलिस स्टेशन व जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी,तालुका पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी संचलनाद्वारे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. तसेच जिजामाता विद्यालयात अमली पदार्थ विरोधी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थांनी अमली पदार्थ विरोधी घोषणा दिल्या.
या संचालनामध्ये जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलिस उपनिरीक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जेजुरी शहरांमध्ये पथसंचलन करण्यात आले. यावेळी जिजामाता विद्यालयात मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे,विश्वस्त अनिल थोरवे, विद्यालयाची माजी विद्यार्थीनी एम.बी.बी.एस कोर्ससाठी बी.जे मेडिकल कॉलेज पुणे येथे प्रवेश मिळालेली शर्वरी जगताप यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.अमली पदार्थाच्या विळख्यापासून तरुणाईला मुक्त राहण्याचे आवाहन या निमित्त करण्यात आले.
या रॅलीत जिजामाता विद्यालयाचे १५०० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते निरोगी व सक्षम राष्ट्रनिर्माणासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी व्यक्त केले.
तसेच व्यसनाधीनतेमुळे जीवनाचा नाश होतो, अमली पदार्थाचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. अशा कटकटींपासून तरुणांनी अलिप्त राहणे हे आरोग्यासाठी व उत्तम जीवनासाठी आवश्यक आहे असे विचार जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी व्यक्त केले.
यावेळी संपूर्ण जेजुरी शहरातून संचनाद्वारे नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका लीना पायगुडे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे माध्यमिक विभागप्रमुख बाळासाहसेब जगताप, जिजामाता संकुलाचे समन्वयक प्रल्हाद गिरमे ,सोमनाथ उबाळे,कैलास सोनवणे,संपतराव कड,राजाराम पिसाळ,महेश खाडे , अजय जगताप, गणेश खळदकर,योगेश घोरपडे,कुलदीप साळवे,राजेंद्र ताम्हाणे,राघू हारूळे, गणेश भंडलकर, सुरेश जगताप यांनी केले.सूत्रसंचालन सागर चव्हाण यांनी केले.