आकुर्डीत भीषण अपघात : बीएसएनएलच्या चेंबरमध्ये तीन कामगारांचा मृत्यू

Photo of author

By Sandhya

पुणे, आकुर्डी – बीएसएनएलच्या ऑप्टिक फायबर लाईनमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या चार कामगारांपैकी तिघांचा प्राण गमवावा लागला. हा अपघात काल दुपारी दोनच्या सुमारास झाला. चेंबरमध्ये प्राणघातक वायू श्वसन नलिकेत अडकल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.

मृतांमध्ये लखन ढावरे (वय 32, रा. बिजलीनगर), दत्ता होनाले (वय 35, रा. गुरुद्वारा कॉलनी) आणि दादासाहेबराव गिरसेट (वय 35-रा. बिजलीनगर) यांचा समावेश आहे. तर बाबासाहेब वाघ (वय 52, रा. आकुर्डी) हे कामगार थोडक्यात बचावले आहेत.

प्रत्यक्षदर्शी बाबासाहेब वाघ यांनी सांगितले,
“आम्ही चौघेजण चेंबरमध्ये वायर काढण्याचे काम करत होतो. सर्वप्रथम लखन ढावरे खाली उतरले. काही क्षणांतच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना वाचवण्यासाठी दत्ता होनाले उतरले, पण त्यांनाही श्वास घेता येईनासा झाला. त्यांना बाहेर काढण्यासाठी दादासाहेबराव गिरसेट खाली उतरले, पण तेही कोसळले. मी लगेच मदतीसाठी ओरडलो. लोकांनी धाव घेत तिघांना बाहेर काढले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.”

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page