

राजेंद्रसिंह गौर पोलीस
अपधिक्षक
जेजुरी वार्ताहर दिनांक 21 नियमांच्या चौकटीत राहून उत्साहाने गणेश उत्सव साजरा करा. डिजे,डॉल्बी ही आपली संस्कृती नाही त्याच्या नादी लागू नका.पारंपारिक वाद्य व्यवसायिकांना प्रोत्साहन द्या.असे आवाहन भोर विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी केले.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे जेजुरी येथे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस जेजुरी,नीरा,वाल्हे व पंचक्रोशीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्रसिंह गौर यांनी ब्रिटिश काळात फोडा आणि झोडा या नीतीच्या विरोधात जनजागृती व राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश व शिव जयंती सुरू केली.गणेशोत्सवाला पुणे जिल्ह्यात मोठी परंपरा आहे. येणारा गणेशोत्सव कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून मोठ्या उत्साहाने साजरा करा.महाराष्ट्र शासनाने हा उत्सव राज्य उत्सव म्हणून जाहीर केला आहे.राज्य व जिल्हा स्तरावर गणराया पुरस्कार मिळविण्यासाठी मंडळांनी प्रयत्न करावेत.
डीजे डॉल्बीच्या नादी लागून नका,महिला वयोवृध्द,लहान मुले यांना आवाजाचा प्रचंड त्रास होतो,मिरवणुकीत लेझरचा वापर केल्यास मंडळावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा ही राजेंद्रसिंह गौर यांनी दिला.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी गणेशोत्सव काळात नियम पाळावेत,स्वयंशिस्त राखून विधायक ,धार्मिक उपक्रमांनी उत्सव साजरा करावा असे आवाहन केले.
गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या बोनेट वर स्टेज बांधून त्यावर अनेक कार्यकर्ते विचित्र हावभाव करून नृत्य करतात ,आपल्याच घरातील महिला मुली हे दृश्य पाहतात हे अशोभनीय आहे.असे प्रकार मंडळांनी टाळावेत असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक दिपाली पवार यांनी या वेळी केले.
या कार्यक्रमात मागील गणेशोत्सव काळात सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी जाहीर केलेले गणराया अवार्ड पुरस्कार देण्यात आले.
जेजुरी येथील सुवर्ण स्टार सोशल व स्पोर्ट्स कल्ब यांना प्रथम, जननी मित्र मंडळाला द्वितीय ,उघडा मारुती मित्र मंडळाला तृतीय क्रमांकाचे गणराया अवार्ड देण्यात आले.तर अखिल जुनी जेजुरी मित्र मंडळ व गोल्डन मित्र मंडळाला उत्तेजनार्थ अवार्ड देण्यात आले.
तसेच नीरा येथील त्रिमूर्ती गणेश मंडळ वार्ड क्रमांक 2 प्रथम,सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ वार्ड क्र 3,आणि बुवांसाहेब तरुण मंडळ वार्ड क्रमांक 6 यांना द्वितीय आणि कानिफनाथ तरुण मंडळ वार्ड क्रमांक 4 यांना तृतीय क्रमांकाचे गणराया अवार्ड देवून गौरविण्यात आले.
या गणराया अवार्डचे परीक्षण नितीन राऊत व राहुल शिंदे यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक सचिन सोनवणे,हेमंत सोनवणे,अजिंक्य देशमुख,भाजपाचे शहर अध्यक्ष सचिन पेशवे,अलका शिंदे,शिवसेनेचे शहर अध्यक्ष विठ्ठल सोनवणे,पुणे जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे विजय कुंजीर,जेजुरी नगरपरिषदेचे अधिकारी अक्षय शिरगिरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सपोनी दीपक वाकचौरे, आण्णासाहेब देशमुख,भूषण कदम आदींनी केले. सूत्रसंचालन श्री मार्तंड देवसंस्थान चे माजी विश्वस्त नितीन राऊत यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे यांनी मानले.
फोटो पाठविला आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन आयोजित गणेश मंडळाच्या बैठकीत उत्कृष्ट मंडळांना गणराया अवार्ड देताना.