
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर (ता. २२ ऑगस्ट ) शुक्रवार रोजी पहाटे चार चाकी कारने डिव्हायडर वरुन विरुद्ध दिशेला जाऊन ट्रकला समोरासमोर जाऊन जोरदार धडक दिली. यात बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २२) सकाळी पावणे सहाच्या सुमारास सोडतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर घडली. महेश अंबादास गलगटे ( वय ३६, रा. राममंदिर लेन, आष्टी, जि. बीड) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी कार सोलापूरच्या दिशेने जात असताना मुक्या प्राण्याला वाचविताना दुभाजकाला धडकून चारचाकी आणि विरुद्ध पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक यांचा समोरासमोर आल्याने भीषण अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेले महेश अंबादास गलगटे हे बार्शी शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहेत. ते शुक्रवारी (ता. २२) पहाटे आपल्या चारचाकीसह ( एमएच २४ वि ९५४०) सोलापूरच्या दिशेने दिशेने निघाले होते. सकाळी पावणे सहाच्या सुमारास सोडतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोरून त्यांची चारचाकी जात असताना दुभाजकावरून मुकं प्राणी महामार्ग ओलांडताना त्यांना दिसलं. मुक्या प्राण्याला वाचविताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि चारचाकी गाडी ही दुभाजकाला धडकून थेट विरुद्ध पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक (एमएच १२ टीवी २८२८) ला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की महेश गलगटे यांच्या चारचाकी गाडीचा अक्षरश: चुरा झाला असुन या अपघातात पोलिस उपनिरीक्षक महेश गलगटे हे सुदैवाने वाचले. तर ट्रक चालक थोडक्यत बचावला.
सदर घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर मनोहर पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, सहा पो उपनिरीक्षक रमेश भोसले,पो हवा सोमनाथ सुपेकर, उद्धव गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. यांनी तत्काळ भेट देऊन अपघातग्रस्त ट्रक व चारचाकी ही क्रेनच्या सहाय्याने महामार्गामधून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच गंभीर जखमी झालेले पोलिस उपनिरीक्षक महेश गलगटे यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.