
पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या १२५ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता वैभवशाली सांगता मिरवणुकीने होणार आहे. तुळशीबाग महागणपतीची सांगता मिरवणूक मयूर रथातून निघणार आहे.
मयूर रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून हा रथामध्ये हायड्रोलीक पद्धतीचा वापर केला जाणारा आहे. रथाची उंची ३५ फूट इतकी असून हा रथ १६ फूट रुंद आणि २४ फूट लांब असणार आहे. मंडळाच्या १२५ व्या वर्षानिमित्त महिला व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारा असून ढोल ताशा पथके देखील सहभागी होणार आहेत.