
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन दादागिरी केली. कुर्डू येथील दादाराव गोरख माने यांची शेती गट नंबर 575/1 मधील 0.20 आर जमिनीमधील अंदाजे 120 ब्रास मुरूम उपसा करताना अडवणूक केल्यानंतर गावातील एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. त्यावेळी, अजित पवारांनीही फोनवरुन संबंधित महिला अधिकाऱ्यास कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, अजित पवारांवर टीकेची झोड उठल्याने बाबा जगताप ,नितीन माळी ,संतोष कापरे ,अण्णा धाने यांच्यासह १५ ते २० ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अशी फिर्याद प्रीती प्रकाश शिंदे ग्राम महसूल अधिकारी कुर्डू रा. मोडनिंब ता. माढा जिल्हा सोलापूर यांनी याबाबत तक्रारदाखल केली आहे.
आरोपींनी संगणमत करुन तहसीलदार माढा यांची कोणतीही परवानगी न घेता पर्यवरणाचा ऱ्हास करुन मौजे कुर्ड शेती गट नंबर 575/1 मधील शेतकरी श्री दादाराव गोरख माने यांच्या मालकीचे 0.20 आर. जमीनमधील अंदाजे 120 ब्रास मुरुम प्रति ब्रास 600/- रुपये प्रमाणे एकूण 72,000/- रुपयांचा मुरुम अवैद्यरित्या उत्खनन करन चोरी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. याशिवाय जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.