महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समितीने घेतली ‘कॅग’च्या अहवालातील प्रकरणाबाबत माहिती

Photo of author

By Sandhya

महाराष्ट्र विधानमंडळ लोक लेखा समितीची बैठक समिती प्रमुख आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज झाली. यावेळी भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या सन २०१८-१९ या वर्षाच्या आर्थिक व महसूल क्षेत्र अहवालातील अनर्जित उत्पन्नाच्या महसूल वसूलीबाबतच्या परिच्छेदाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची माहिती घेऊन म्हणणे नोंदविण्यात आले.

बैठकीस समिती सदस्य आमदार प्रकाश सोळंके, सत्यजीत तांबे, समीर कुणावार, कृपाल तुमाने, रोहित पवार, महेश शिंदे, विधान मंडळाचे सहसचिव नागनाथ थिटे, उपसचिव उमेश शिंदे उपस्थित होते.

बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, वैभव नावडकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, महसूल तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी माहिती सादर केली. अपर आयुक्त (महसूल) तुषार ठोंबरे यांनी स्वागत केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page