भीषण स्फोटात एक कामगार ठार,चार जण गंभीर जखमी.

Photo of author

By Sandhya


पालघर.
काल दिनांक १८सप्टेंबरला पालघर मनोर रोडवरील प्लॉट नंबर२१,सर्व्हे नंबर ५३, लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज ह्या कंपनीत संध्याकाळी साडेपाच च्या सुमारास उत्पादन सुरू असताना भीषण स्फोट होऊन एक कामगार जागीच ठार ,अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले.त्यातील दोघांना मुंबईला पाठवण्यात आले असून बाकी दोघांना ढवळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.पालघर पोलिस अधीक्षक श्री. यतीश देशमुख घटनास्थळी उपस्थित झाले असून धातू व आम्ल ह्याचे मिश्रण करताना स्फोट झाल्याचे कळण्यात आले.
दीपक किशोर आनंदे असे मृत कामगाराचे नाव असून अन्य जखमी कामगारांची नावे पुढील प्रमाणे १) दिवेश घरत २)संतोष तरे ३)सुरेश कोम४)लक्ष्मण मंडळ.पालघर पोलिस व एम पी सी बी पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page