



ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
सेवा पंधरवड्याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना नाचणी बिस्किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ
मुलांना लहान वयात चांगली जीवनसत्त्व मिळणं आवश्यक असून, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी अतिशय आग्रही आहेत. त्यामुळे मुलांनी देखील आपल्या घरी नाचणीचे पदार्थासाठी आग्रह धरावा, असा कानमंत्र ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच, कोथरुड मतदारसंघातील मुलांमध्ये पौष्टिक आहाराची गोडी लागावी यासाठी २२००० विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस नाचणीची बिस्किटे उपलब्ध करुन देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा; यासाठी नाचणीची बिस्किटे उपलब्ध करुन देण्यात आली असून, या उपक्रमाचा शुभारंभ आज बाणेर मधील कै. बाबुराव बालवडकर प्राथमिक विद्यालयात झाला. यावेळी ना. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
ना. पाटील म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला लहान वयात योग्य पोषक आणि पौष्टिक आहार मिळणे आवश्यक असते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुलांना लहान वयात चांगली जीवनसत्त्वे मिळावीत यासाठी सदैव आग्रही असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील फास्ट फूड ऐवजी पौष्टिक आहारासाठी पालकांकडे आग्रह धरला पाहिजे. जेणेकरून चांगली जीवनसत्त्वे मिळून शारिरिक विकासासाठी मदत मिळेल.
या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका सुजाता वाघमारे, कल्पना बाबर, सुकेशनी मोरे, शोभा घोरपडे, भाजप कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजप नेते गणेश कळमकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, अस्मिता करंदीकर, अनिकेत चांधेरे, वैदेही बापट, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, निकीता माथाडे, जागृती विचारे, स्नेहल सुतार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.