
हवेली तालुक्यातील वळती येथे (ता. 19) दुपारी चार वाजता वळती येथील शेतकरी मच्छिंद्र शिवराम कुंजीर ,शंकर सुभान कुंजीर हे हे डोंगराच्या कडेला गाय म्हैस व बैल चरत आहेत का हे पाहण्यासाठी गेले असता . रान जनावर म्हैशी वर हल्ला करत असल्याचे दिसले .त्यांनी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला असता शंकर कुंजीर यांना जोरदार धडक देऊन खाली पाडले तर मच्छिंद्र कुंजीर यांच्या वर हल्ला केला त्यात ते जखमी झाले असुन उरुळी कांचन येथील हाँस्पिटल मध्ये दाखल केले आहे . याविषयी पोलीस पाटील म्हणून कुंजीर यांनी सांगितले की या रान जनावरांचा खूपच त्रास वाढला असून शेतीतील पिके फस्त करत आहेत तसेच जनावरांवर सुद्धा हल्ले करत आहेत आज तर त्यांनी माणसांवर सुद्धा हल्ला केला असल्यामुळे वरती गावात भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाने ताबडतोब याची दखल घेऊन रान जणावारांचा बंदोबस्त करावा . वळती गावातील शेतकऱ्यांना वारंवार या संकटाचा सामना करावा लागत असतो तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान व नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत देण्यात यावी मागील दोन वर्षात बिबट्याने १०ते १२ जनावरे मारली आता रान जनावरे शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत.त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी असे नागरिकांनी सांगितले.
वळती परिसरात रान जनावरांचा कळप रात्री बाहेर पडतात, यात १२ ते १५ रान जनावरे असतात, यांच्यापासून शेतकऱ्याला मोठा धोका आहे. या रान जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ऊस, मका, कांदा, कडवळ या पिकांचे उकरून नकसान करत आहे.