



महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई देवी मंदिरात नवरात्र उत्सवा निम्मित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जानाई देवी हे जेजुरीची ग्राम दैवता असून ग्रामस्थांचे जागृत श्रद्धास्थान आहे. सुमारे चार कोटी रुपये खर्चून जेजुरीत देवीचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.
नवरात्र उत्सवा निमित्त जेजुरी ग्रामदैवत सार्वजनिक श्री जानाई देवी मंदिर ट्रस्ट जेजुरी व श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी ग्रामस्थ ट्रस्टच्या वतीने जानाई देवी मंदिरात घट स्थापना होऊन दररोज देवीची विविध रूपे साकारली जात आहेत. या नवरात्र उत्सवात भजन,कीर्तन,देवीचा जागर,व श्री मद देवी भागवत ग्रंथाचे कृष्णदास यांचे प्रवचन,होम हवन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जाणाई देवी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून देवीच्या दर्शनासाठी व विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.