
वरवंड:- कडेठाण येथील रेल्वे भुयारीमार्ग कायमस्वरूपी पाण्यात साचत असून नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. प्रवास करताना नागरिकांचे खूप हाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. परंतु संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे भुयारात साचणाऱ्या पाण्याचा बाहेर जाण्याचा मार्ग व्यवस्थित नसल्यामुळे पाणी साचून राहत आहे.यामुळे नागरिकांची अशी मानसिकता झाली आहे की फाटक बर पण भुयारी मार्ग नको अशी परिस्थिती निर्माण झाले आहे.नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होत आहे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष रेल्वे प्रशासन देणार का हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सतत साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागत असून शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे हा भुयारी मार्ग कायम रहदारीचा असून या रस्त्यावरून हातवळण सादलगाव,मांडवगण,वडगाव रासाई,कडेठाण,वरवंड परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा मुख्य रस्ता असून या भुयारात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांची आहे परंतू रेल्वे प्रशासन याची दखल घेणार का हे पाहणं महत्वाच ठरणार