मंचर मध्ये दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

Photo of author

By Sandhya

मंचर शहरामध्ये व आजुबाजूच्या वस्त्यामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त दररोजदुर्गा माता दौड काढून शक्तीचा जागर करण्यात आला. सकाळी काढण्यात येणाऱ्या श्री दुर्गामाता दौडला उस्फूर्त प्रतिसाद मिळून, ठिकठिकाणी दुर्गामाता दौडचे नागरिकांकडून स्वागत झाले.

“आई जिजाऊनी” दाखवलेल्या, श्री शिवछत्रपती संभाजी महाराजांनी उज्वल केलेल्या राष्ट्रभक्ती धर्मभक्तीच्या मार्गावर जोमाने चालण्याच बळ मिळवण्यासाठी… अवघी तरुण पिढी सशक्त निर्व्यसनी राष्ट्रभक्त धर्मभक्त देशभक्त बनवण्यासाठी… उगवती तरुण पिढी श्री शिवाजी, श्री संभाजी या दोन महामृत्युंजय मंत्राच्या विचारांची कार्यकर्तृत्वाची ध्येयधोरणाची इच्छा आकांक्षाची बनवण्यासाठी… सुरु केलेला उपक्रम योजलेला मार्ग म्हणजे..

॥ श्री दुर्गा माता दौड ||

दसऱ्याच्या दिवशी श्री दुर्गामाता महादौड काढून संपूर्ण मंचर पांचक्रोशीत गीतांचा, घोषणांचा आवाज घुमला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर दौड ला प्रारंभ होऊन प्रभु राममंदिर येथे महाआरती घेण्यात आली. भैरवनाथ मंदिर मार्गे ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुजन करून छत्रपती संभाजी महाराज चौकातून पुणे नाशिक हायवे वरून दुर्गादौड धर्मवीर चंद्रशेखर अण्णा मार्गाने पुन्हा शिस्त व संस्कृती जपत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली. यावेळी दुर्गानी ठीक ठिकाणी रांगोळ्या काढून, साड्या, फेटे लहान लहान मुलांनी आपल्या धर्माची संस्कृतीची ओळख जपण्यासाठी वेशभूषा केली होती.

श्री दुर्गामाता दौड घेऊन शेवाळवाडी व इंदिरानगर येथे ज्यावेळी देवीचा जागर करण्यासाठी गेलो तेथील नागरिकांनी भव्य दिव्य स्वरूपात दुर्गामाता दौडचे स्वागत करून पुजा केली व आईकडे साकडे घातले की आमचे हिंदवी स्वराज्य अखंड राहूदे, आमच्या मुली बाळी लव जिहाद, धर्मांतरण पासून सुरक्षित राहूदे, आम्हाला आशीर्वाद दे, हिंदु धर्माचे काम करण्यासाठी बळ दे आई.

पहिल्या दिवसापासून दुर्गा दौडमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बाल गोपालांचा सहभाग चांगल्या प्रकारे होता.

दुर्गामाता दौडचे नागरिकांकडून स्वागत होत असताना पुढच्या वर्षी आम्ही यापेक्षा भव्य स्वागत करू आम्हाला अगोदर सांगा असे देखील सांगण्यात आले. विजयादशमीनिमित्त दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांची आरती व प्रेरणा मंत्र घेऊन सांगता करण्यात आली. त्यानंतर सर्व शस्त्रांची जिल्हा परिषद शाळा मंचर येथे शस्त्र पूजन करून मार्गदर्शन करण्यात आले.

दुर्गामाता दौड आंबेगाव तालुक्यात 18/20 ठिकाणी मोठ्या प्रमाणात काढण्यात आली. दौडला प्रत्येक गाव वस्तीत परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच श्री दुर्गामाता दौडसाठी दुर्गावाहिनी, शिवप्रतिष्ठान, बजरंग दल, आर एस एस, भाजप व इतर अनेक हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. दुर्गामाता दौडचे संपूर्ण नियोजन अ‍ॅड. स्वप्ना ताई खामकर पिंगळे, सुमीत भाऊ काळे, मनिषा ताई चासकर, निलेश थोरात, आकाश गवारे, छायाताई थोरात, अभिषेक बागल, संदेश थोरात, अमोल शेवाळे, आदिती मोरडे, ज्ञानेश्वरी गोडसे, मयुर भोसले यांनी केले. दुर्गामाता दौडचे दहाही दिवस सकाळी लवकर येऊन व्हिडीओ काढून अतिशय सुंदर पद्धतीने सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम राजेश शेठ चासकर यांनी केले. ज्ञात अज्ञात शक्तींनी सहकार्य केले त्यांचे देखील आभार. हिंदु धर्माचे काम असेच अखंड चालू राहील.

Leave a Comment

You cannot copy content of this page