


सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन
व्हिजन सखी ग्रुपच्या वतीने जेजुरीत हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन व आनंद मेळा चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला शहरातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.
जेजुरी येथील व्हिजन सखी महिला बचत गटाच्या वतीने महिलांना उद्योग व व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला संधी देवून महिला सबली करणासाठी जेजुरी येथील सागर हॉल मध्ये शनिवार दिनांक 11 रोजी हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . या उपक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांनी महिलांनी उभारलेल्या विविध स्टॉल ची पाहणी करून महिलांना प्रोत्साहन दिले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना सविता व्होरा यांनी ग्रामीण भागात उत्कृष्ट नियोजन करूनय हा आनंद मेळा घेतला ही बाब उल्लेखनीय आहे.पुढील काळात सूनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीमथडी प्रमाणे आयोजन केले जाईल.
तसेच पुरंदर तालुक्यातील ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनी जगताप या आनंद मेळा उपक्रमाला भेट देऊन महिलांना प्रोत्साहन दिले.
जेजुरी शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या मेळाव्यात महिला बचत गट , घरगुती व लघुउद्यागतून तयार केलेल्या वस्तू,कपडे,लोणची पापड,दिवाळी निम्मित गृह सजावटीच्या वस्तू,दिवाळी फराळ,तसेच लहान मुलांसाठी विविध खेळणी असे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे आयोजन दीपाली खुडे,अर्चना क्षीरसागर,श्वेता कटफळकार,वनिता बयास,साधना दीडभाई,सीमा पवार मनीषा बारभाई,सुखदा केंजळे ,अरुणा काकडे आदींनी केले.