दौंड पंचायत समितीच्या इमारतीसाठी 13 कोटी 19 लाखाचा निधी मंजूरआमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Photo of author

By Sandhya

यवत-दौंड येथील पंचायत समितीच्या नवीन सुसज्य व अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 13 कोटी 19 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आमदार राहुल कुल यांनी आभार मानले.

उपविभागीय अधिकारी (प्रांत) व तहसीलदार कार्यालययाच्या परिसरात २ एकर जागेमध्ये ही नवीन इमारत साकारली जाणार असून, इमारतीसाठी निधी मंजूर झाल्याने दौंड तालुक्याच्या ग्रामविकास कामकाजाला अधिक गती मिळून प्रशासकीय सेवा आणखी परिणामकारक होतील. पहिल्या टप्प्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यात अधिकारी निवासस्थाने व उर्वरित कामासाठी देखील १५ कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे.

दौंड तालुक्याच्या सर्व नागरिकांसाठी ही मोठी समाधानाची बाब आहे. या इमारतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि आधुनिक स्वरूपात पार पडेल, याचा आनंद वाटतो. असे राहुल कुल म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page