




गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिराची आवश्यकता आहे रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदात्यांना प्रोत्साहन देणे आणि रक्ताच्या तुटवडा भरून काढणे महत्त्वाचे आहे, जनजागृती समाजसेवेच्या भावनेतून अधिका अधिक लोकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होण्याची गरज आहे व रक्तदान ही काळाची गरज आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जैन प्रकोष्ठ व आनंद दर्शन युवा मंच तर्फे रक्तदान व आरोग्य शिबिर बिबवेवाडी येथील पुष्पमंगल चौक पुष्पा हाईट येथे सम्पन्न झाले,
यावेळी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी २३८ बॉटल रक्तसंकलन करण्यात आले आहे.
तसेच आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे 200 लोकांनी त्याचा लाभ घेतला
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून व आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड समाजसेवेचा उपक्रमात सहभाग नोंदविला.
शिबिराचे उद्घाटन जीतो अपेक्स चेअरमन विजय भंडारी यांच्या हस्ते झाले. यावेळी विजयकांत कोठारी, आमदार सुनील कांबळे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेविका मानसी देशपांडे, बाळासाहेब ओसवाल, मनोज देशपांडे, राजश्री शिळीमकर, पोपटशेठ ओस्तवाल , इंदर छाजेड, अनिल भन्साळी, एकता भन्साळी, माणिक दुगड, किर्तीराज दुगड, विजय भटेवरा, मनोज छाजेड, ललित शिंगवी, दिलीप कटारिया, रवी दुगड, बाळासाहेब धोका, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी व पुणे शहराध्यक्ष महेंद्र सुंदेचा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरा, अभिजीत शहा, जिनेंद्र कावेडिया, आनंद गादिया, सौरभ धोका, पंकज बाफना, उमेदमल धोका, महेश खिवंसरा, व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदीप भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा जैन प्रकोष्ठ पुणे शहर अध्यक्ष महेंद्र सुंदेचा यांनी केले.