बारामती शहरामध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक

Photo of author

By Sandhya


बारामती-बारामती शहरात नगरपरिषद निवडणूक व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविलेल्या बारामती शहर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सतिष राऊत,पोलिस अंमलदार अभिजित कांबळे,अमीर शेख,रामचंद्र शिंदे,अक्षय सिताप,दत्तात्रय मदने,सागर जामदार,विशाल शिंदे,गिरीष नेवसे असे शहरात पेट्रोलिंग करत असताना एक इसम संशयितरित्या फिरत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी पिस्टल व एक जीवंत काडतूस मिळून आल्याने आरोपी प्रेम दयानंद कांबळे,वय-19 वर्ष,रा.भोईटे हाॅस्पिटल समोर,इंदापूर रोड,बारामती,ता.बारामती,जि.पुणे याच्यावर बारामती शहर पोलिस स्टेशन येथे दि.12/11/2025 रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.अशाप्रकारे बेकायदा घातक शस्त्रे बाळगून दहशत माजविणाऱ्या लोकांची माहिती तात्काळ पोलिस स्टेशनला कळविणेबाबत पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.सदरची कामगिरी ही संदिपसिंग गिल(पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण),रमेश चोपडे(अप्पर पोलिस अधीक्षक पुणे),गणेश बिरादार(अप्पर पोलिस अधीक्षक बारामती),सुदर्शन राठोड(उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती),श्रीशैल चिवडशेट्टी(पोलिस निरीक्षक बारामती शहर पोलिस स्टेशन) यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page