

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर पौराणिक व धार्मिक महती असणारा चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे.या उत्सवाच्या चौथ्या दिवशी जेजुरी गडावर होम हवन,मल्हारी सहस्त्र नाम याग करण्यात आला.
तसेच देव दिवाळी निमित्त विविध प्रकारची मिठाई,फळे व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई ने संपूर्ण गड उजाळून निघाला आहे.
दररोज सुमारे पन्नास हजार भाविकांना महाप्रसाद सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान , श्री मार्तंड देवसंस्थान ,पुजारी सेवक वर्गाच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.