


रमणबाग शाळा आणि वॉलनट स्कूल शिवणे यांनी पटकवला यंदाचा AWIM पुणे ओलिंपिक्स 2025
पुणे : एसएई इंडिया (SAEINDIA) वेस्टर्न सेक्शनतर्फे आयोजित एडब्लूआयएम (AWIM) पुणे ओलिंपिक्स 2025 स्पर्धेचे भव्य आयोजन आज मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर येथे उत्साहात पार पडले. पाचवी आणि सहावीतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातील रूची वाढविण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. AWIM उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्किमर आणि जेट टॉय या दोन अभियंत्रिकी आधारित खेळण्यांच्या डिझाईन स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागाची संधी देण्यात आली. या खेळण्यांच्या निर्मितीपासून ट्रॅक चाचण्या आणि सादरीकरणापर्यंत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला विजय पंखावाला एआरएआयचे (ARAI) वरिष्ठ उपसंचालक व विभागप्रमुख तसेच एसएई इंडिया (SAEINDIA) वेस्टर्न सेक्शनचे गव्हर्निंग बोर्ड सदस्य, केशव ताम्हणकर स्पेक्ट्राटेकचे संचालक, स्वाती सरदेसाई मिलेनियम नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका, महेश मसूरकर – जॉन डिअर; तसेच एसएई इंडिया (SAEINDIA) वेस्टर्न सेक्शनचे गव्हर्निंग बोर्ड सदस्य, विभावरी पाटील एनबीटी इनोव्हेशनच्या संचालक तसेच एसएई इंडिया (SAEINDIA) वेस्टर्न सेक्शनच्या गव्हर्निंग बोर्ड सदस्य, नरहरी पी. वाघ व्हेक्टर इंजिनिअरिंग सोल्यूशन्सचे संचालक तसेच एसएई इंडिया (SAEINDIA) वेस्टर्न सेक्शनचे गव्हर्निंग बोर्ड सदस्य, एम. डी. शुजा गालिब संयोजक, संजय निबंधे माजी अध्यक्ष एसएई इंडिया (SAEINDIA) वेस्टर्न सेक्शन तसेच सध्याचे व्यवस्थापन समिती सदस्य, आणि SAEINDIA वेस्टर्न सेक्शनचे गव्हर्निंग बोर्ड सदस्य, मोहन पाटील, सहाय्यक संचालक, एसएई इंडिया
(SAEINDIA) वेस्टर्न सेक्शन आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते.
संजय निबंधे म्हणाले “गेल्या पंधरा वर्षापासून ही स्पर्धा सुरू आहे. विज्ञानाच्या अशा विविध प्रोग्राम मधून विद्यार्थ्यांना चांगले लर्निंग होते. यातून विज्ञान आणि गणिताची मुलांमध्ये नक्कीच आवड निर्माण होईल. लवकरच ही स्पर्धा मोठ्या स्तरावर घेण्याची तयारी आमच्याकडून सुरू आहे.”
केशव ताम्हणकर म्हणाले, “विद्यार्थ्यांना कृतीतून केलेली गोष्ट कायम लक्षात राहते. या स्पर्धेसाठी शाळा अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून सराव करून घेते. आपल्या हातून एखादी चूक झाली ती कायम लक्षात राहते आणि पुन्हा विद्यार्थी ती चूक करत नाही. चुकीतून आज मुले शिकतात पुढे जाऊन बेसिक गोष्टी समजण्यापेक्षा मुलांना यातूनच बेसिक गोष्टी समजू लागतात आणि त्यांची आवड निर्माण होऊ लागते यातूनच भविष्यासाठी आम्ही विद्यार्थी घडवतो “.
स्वाती सरदेसाई म्हणाल्या “आज विद्यार्थी एखादी गोष्ट कृतीतूनच शिकतात आणि लक्षात ठेवतात. यातूनच त्यांची क्रिएटिव्ह,क्रिटिकल थिंकिंग सुरू होते आणि नवीन गोष्ट शिकण्याची रुची निर्माण होते. मी विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छिते रोज नवीन प्रयत्न करा मात्र हार मानू नका. आज या स्पर्धेत जिंकला नाहीत तर निराश होऊ नका या स्पर्धेतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही शिकला आहात याचा आनंद बाळगा उद्या परत नव्याने उठा आणि पुन्हा नवीन शिकण्याची तयारी ठेवा “.
स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन SAEINDIA वेस्टर्न सेक्शन आणि John Deere India Pvt. Ltd., मिलेनियम स्कूल आणि एआरएआय यांच्या टीमने केले. यंदाचे एडब्लूआयएम (AWIM) पुणे ओलिंपिक्स 2025 चे विजेते रमणबाग शाळा आणि वॉलनट स्कूल शिवणे यांनी पटकवला.
संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एसएई इंडियाचे (SAEINDIA) सागर मुरुगकर,ओंकार देशपांडे व परेश शितोळे यांनी मेहनत घेतली.
या स्पर्धेत अनापूर्णा आश्रमशाळा, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, मिलेनियम नॅशनल स्कूल, मोलेदिन हायस्कूल, रमणबाग शाळा, पीएमसी ठाकरे विद्यालय तसेच वॉलनट स्कूलच्या विविध शाखांसह अनेक शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि नवकल्पनांना भरभरून दाद
स्किमर आणि जेट टॉय या दोन्ही मॉडेल्ससाठी विद्यार्थ्यांनी सिद्धांत, गणित, गतीशास्त्र आणि डिझाईन या सर्व घटकांचा उत्तम वापर करून आपली मॉडेल्स सादर केली. त्यांच्या कल्पकतेला आणि नवोन्मेषी विचारांना परीक्षकांनी मोठी प्रशंसा केली.