राजगुरुनगर हादरले! खाजगी कोचिंग क्लासमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा क्लास सुरू असताना वर्गातच एका विद्यार्थी कडून दुसऱ्या विद्यार्थी वर धारधार शस्त्राने हल्ला.

Photo of author

By Sandhya

राजगुरुनगर

राजगुरुनगर शहरात आज सकाळी घडलेल्या एका खळबळजनक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेला आहे.
एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये इयत्ता दहावी चे क्लास सुरू असतानाच, वर्गातील एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थी मित्रावर धारदार हत्याराने गळा चिरून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाडा रोड,प्रांत कार्यालय समोरील बाजूस एका खाजगी संस्कार कोचिंग क्लासमध्ये दहावीच्या क्लास साठी मुले येत होती.आज सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास क्लास सुरू असताना दोन्ही मुलांच्या मध्ये वाद होऊन एका अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दुसऱ्या विद्यार्थी मित्र पुष्कराज दिलीप शिंगाडे या मुलावर गळ्यावर व पोटावर धारधार शस्त्राने वार केले.हा संपूर्ण प्रकार शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समोरच घडल्याने वर्गात एकच गोंधळ उडाला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुष्करला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर कोचिंग क्लासमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कोचिंग क्लासमधील सीसीटीव्ही फुटेज, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे जबाब, तसेच वापरलेल्या हत्याराची तपासणी सुरू आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचे माहिती पोलिसांनी दिली .पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page