श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना मारहाण

Photo of author

By Sandhya

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना मंदिर विश्वस्तांसमोर सुरक्षारक्षकांकडून सर्रासपणे मारहाण केली जात आहे. याबाबत काही भाविक सोशल मिडियावर चित्रफित टाकत आहेत. तर काही भाविकांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आहे. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव असलेल्या भीमाशंकर येथे कोणाच्या आशिर्वादाने सुरक्षा रक्षकांचा गुंडाराज सुरू आहे, असा आरोप भाविक करत आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे स्थानिक आदिवासी तरूण मुलांची सुरक्षारक्षक नेमणूक न करता भीमाशंकर देवस्थानने पंढरपूर येथील खाजगी मुले – मुली यांची पहारा देणे, प्रवेश नियंत्रण करणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आपत्कालिन परिस्थितीत मदत करणे यासाठी नेमणूक केली आहे. जेणे करून सुरक्षा आणि शांतता राखली जाईल. मात्र आपली नेमणूक कशासाठी केली याचे कर्तव्ये विसरून पंढरपूर येथील सुरक्षारक्षक भाविकांकडून पैसे घेत पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी सोडत आहे. अन् याबाबत एखादया जागृत भाविकांनी त्यांना जाब विचारला तर येथील नेमणूकीस असलेले सुरक्षा रक्षक जेश्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांच्या बरोबर भांडत करत, मारहाण करत जमिनीवर ढकलून देत आहे. अन् मारहाणीबाबत भाविकांनी मोबाईलच्या माध्यमातून शुटींग काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा मोबाईल हातातून हिसकावून घेत जमिनीवर फेकून देत मोबाईलचे नुकसान करत आहे. अन् परत भाविक रांगेत उभे न राहता येथून दर्शनासाठी जाण्यासाठी आग्रह करत होते, म्हणून आंम्ही हे केले असल्याचा कांगावा करतात. हा सर्व प्रकार सर्रासपणे भीमाशंकर मंदिर संस्थान देवस्थानच्या विश्वस्तांसमोर होत आहे. मात्र यावर कोणताही विश्वस्त संबंधित सुरक्षारक्षाकांवर कारवाई न देता पाठीशी घालत आहे. दरम्यान श्री क्षेत्र भीमाशंकर येथे विविध राज्यातून भाविक यांच्याबाबत सर्रासपणे घडत असल्याने ते पोलीस ठाण्यात तक्रार न देता सोशल मिडियावर मारहाणीची चित्रफित टाकत आपली भीमाशंकर देवस्थानबाबत नाराजी व्यक्त करत आहे. तर काही भाविकांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या असून त्याचा तपास चालू आहे. याबाबत पोलिस प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांनी देवस्थान विश्वस्त यांना सुरक्षारक्षकांकडून भाविकांना होत असलेल्या अशोभनिय वागणूकीबाबत वारंवार माहिती दिली. परंतु ते याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत देवस्थान अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

Leave a Comment

You cannot copy content of this page