
बारामती-बारामती शहरात खंडणी न दिल्याच्या रागातून एका चायनीज हाॅटेल चालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करत दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी आकाश सिद्धनाथ काळे (वय-29,व्यवसाय-हाॅटेल,रा.देसाई इस्टेट,बारामती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.19 वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर,चिंचकर चौक येथील त्यांच्या “आपले चायनीज” नावाच्या हाॅटेलमध्ये ही घटना घडली.फिर्यादीने सांगितले की मागील 15 दिवसांपूर्वी आरोपींनी हाॅटेल चालू ठेवण्यासाठी प्रोटेक्शन मनी म्हणजेच खंडणी मागितली होती मात्र खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी राग मनात धरुन संगनमताने हाॅटेलमध्ये घुसखोरी केली यातील आरोपी 1)विनायक मारक(मांबरी),2)राहुल चव्हाण,3)राज गावडे, 4)आदित्य बगाडे,5)निहाल जाधव,6)विवेक(पूर्ण नाव अज्ञात) तसेच दोन अनोळखी तरुणांनी मिळून फिर्यादीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर हाॅटेलच्या गल्ल्यातील 8300/-रुपये रोख रक्कम (500 रुपयांच्या 16 नोटा व 100 रूपयांच्या 3 नोटा ) जबरदस्तीने काढून घेत कोयत्याच्या धाकाने दरोडा टाकून फरार झाले.या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून,त्यांना पोलिसांकडून मेडिकल यादी देण्यात आली होती,उपचारानंतर 27 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 471/2025 अन्वये BNS कलम 311,308,310,109,115(2),351(3),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याची नोंद स्टे.डायरी क्रमांक 037/2025,दिनांक 24/12/2025 रोजी सायं.4.11 वाजता करण्यात आली होती.सदर गुन्हा पोलीस हवालदार श्री.धुमाळ यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास मोरे करीत आहेत.यातील काही आरोपींवर यापूर्वीही खून,खंडणी वसूल गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून बारामती शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर नागरिकांतून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.