

Kirloskar Ferrous Company opens its doors to all contract workers for work. Company’s disclosure
जेजुरी वार्ताहर दिनांक 18 कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी सर्व कंत्राटदारांसोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत कंत्राटी कामगारांच्या तक्रारी थेट ऐकून घेतल्या गेल्या तसेच स्थानिक समुदायाला अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी देण्याची आमची बांधिलकी पुन्हा स्पष्ट करण्यात आली. सर्व कंत्राटी कामगारांना कंपनीचे दरवाजे खुले असल्याचे किर्लोस्कर फेरस कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितले
कंत्राट दारांशी चर्चेनंतर कंत्राटदारांनी कंपनीच्या दिशेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, कंत्राटी कामगारांना दिशाभूल करणाऱ्या खोट्या व अप्रमाणित बातम्यांना सक्रियपणे विरोध करण्यास ते सहमत झाले आहेत. तसेच रोजगाराशी संबंधित तक्रारी व प्रश्न सोडवण्यासाठी तृतीय-पक्ष संस्थांच्या मदतीने दोन दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान कारखाना परिसरात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षाला मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भेट दिली.
तसेच कंपनीच्या नेतृत्वाने ग्रामपंचायत सदस्यांशीही चर्चा केली असून, कंपनीची उपस्थिती ही परिसराच्या दीर्घकालीन विकास व समृद्धीसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. २०२२ मध्ये किर्लोस्कर—१३७ वर्षांची भक्कम मूल्ये व ठाम नैतिक तत्त्वांवर उभी असलेली भारतीय कंपनी—यांनी हा कारखाना ताब्यात घेतल्यानंतर सकारात्मक बदल सर्व संबंधितांना स्पष्टपणे दिसून आला आहे.
आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की कामावर येणे थांबवलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कंपनीचे दरवाजे खुले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी आधीच काम सुरू केले असून, उर्वरित कर्मचारीही लवकरच कामावर हजर होतील आणि चुकीच्या माहितीच्या प्रभावाखाली येणार नाहीत, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”, असे किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितले.