‘Jagtap’ pattern dominates Saswad Municipal Council; Elections to all five subject committees unopposed

सासवड नगरपरिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाचही विषय समित्यांच्या निवडी शुक्रवारी (ता. २३) अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. विशेष सभेत सर्व समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी काम पाहिले.
सभागृहात झालेल्या विशेष सभेत सत्ताधारी भाजपाच्या वतीने गटनेते अजित जगताप आणि शिवसेनेच्या वतीने विरोधी गटनेते मंदार गिरमे यांनी आपापल्या सदस्यांच्या नावांची यादी पीठासीन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. सर्व सदस्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने कोणत्याही पदासाठी निवडणूक न होता सर्व निवडी बिनविरोध झाल्या.
नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्याकडे स्थायी समितीची धुरा :
नगरपरिषदेच्या नियमानुसार नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात. त्यानुसार नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी नियुक्ती झाली. या समितीमध्ये सर्व विषय समित्यांचे सभापती पदसिद्ध सदस्य म्हणून कार्यरत राहतील.
विविध विषय समित्या व नवनियुक्त पदाधिकारी:
१. महिला व बालकल्याण समिती:
सभापती: प्रियांका साकेत जगताप
उपसभापती: लिना सौरभ वढणे
सदस्य: स्मिता सुहास जगताप, रत्ना अमोल म्हेत्रे, दिपाली अक्षराज जगताप.
२. पाणी पुरवठा व जलनि:स्सारण समिती:
सभापती: ज्ञानेश्वर गिरमे
सदस्य: शितल प्रविण भोंडे, प्रदीप राऊत, प्रितम म्हेत्रे, सचिन भोंडे.
३. बांधकाम समिती:
सभापती: ज्ञानेश्वर जगताप
सदस्य: अर्चना चंद्रशेखर जगताप, प्रदीप राऊत, वैभव टकले, बाळासाहेब भिंताडे.
४. आरोग्य समिती:
सभापती: राजन जगताप
सदस्य: स्मिता उमेश जगताप, मयुर चौखंडे, माधुरी तेजस राऊत, हेमलता मिलींद इनामके.
५. शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती:
सभापती (तथा उपनगराध्यक्ष): मनोहर जगताप
सदस्य: सोपान रणपिसे, स्मिता उमेश जगताप, मंदार गिरमे, शिल्पा संदीप जगताप.
स्थायी समितीची रचना:
नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील समितीत मनोहर जगताप, प्रियांका जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, ज्ञानेश्वर जगताप, राजन जगताप आणि अजित जगताप यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार संजय जगताप आणि नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांचे आभार मानले. यावेळी संजय जगताप यांनी सर्व नूतन सभापती व सदस्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहरातील प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व समित्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.