पुरंदरमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला दोन ठिकाणी ‘कमळ’ फुलले..

Photo of author

By Sandhya

Shiv Sena’s stronghold in Purandar collapsed, ‘lotus’ bloomed in two places.

​सासवड : पुरंदर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठा राजकीय फेरबदल पाहायला मिळाला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार जागांवर कब्जा मिळविला आहे. विशेष म्हणजे, भाजपनेही माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या दोन जागा जिंकत तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलवले आहे. या निकालांमुळे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांना मोठा धक्का बसला आहे.
​​उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा होती, ज्याची मोठी सहानुभूती निकालांमधून दिसून आली. दुसरीकडे, माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला बळ मिळाले, तर स्वबळावर लढल्यामुळे अनेक ठिकाणी ‘क्रॉस वोटिंग’ आणि वैयक्तिक संबंधांना मतदारांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

​गटवार निकाल:
​१. दिवे-गराडे गट: राष्ट्रवादीचा एकतर्फी विजय
​या गटात राष्ट्रवादीने वर्चस्व गाजवत तिन्ही जागा खिशात घातल्या आहेत.
​जिल्हा परिषद विजयी: रूपाली अमोल झेंडे (राष्ट्रवादी) – २१८२४ मते.
​पराभूत: दिव्या संदीप जगदाळे (भाजपा) – ७८३४ मते.
​ज्योती राजाराम झेंडे (शिवसेना)

​गराडे गण विजयी: अर्चना ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी) – ८०४३ मते.
​पराभूत: सुप्रिया विशाल रावडे (शिवसेना) – ४७९७ मते.
​ललिता दिलीप कटके (भाजपा)

​दिवे गण विजयी: अमित भाऊसाहेब झेंडे (राष्ट्रवादी) – १३४५६ मते.
​ पराभूत: बाळासाहेब दगडू मगर (शिवसेना) – ३३२० मते.
​देविदास संभाजी कामथे (भाजपा)

​२. बेलसर – माळशिरस गट: भाजपची एन्ट्री
​येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे.
​जिल्हा परिषद विजयी: अजय कैलास इंगळे (भाजपा) – ७६२७ मते.
​पराभूत: दत्तात्रेय मारुती झुरंगे (काँग्रेस) – ६२०३ मते.
​अमोल दत्तात्रेय कामठे (शिवसेना उ.बा.ठा.)
​गौरव विजय कोलते (राष्ट्रवादी)
​रमेश रामचंद्र इंगळे (शिवसेना)

​माळशिरस गण विजयी: माऊली यादव (भाजपा) – ५४२४ मते.
​ पराभूत: अजिंक्य रामदास कड (राष्ट्रवादी) – ३८२९ मते.
​शरद बाळासाहेब यादव (शिवसेना)
​हनुमंत मुरलीधर काळाणे (काँग्रेस)

​बेलसर गण विजयी: माणिक बाळासाहेब निंबाळकर (शिवसेना) – ४८०७ मते.
​पराभूत: निलेश कृष्णा जगताप (राष्ट्रवादी) – ४३०८ मते.
​कैलास पंढरीनाथ जगताप (भाजपा)
​कुशाल संजय कोलते (काँग्रेस)

​३. वीर – भिवडी गट: शिवतारेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार
​शिवसेनेचा हा बालेकिल्ला भाजपने भेदला असून येथे चुरशीची लढत झाली.
​जिल्हा परिषद विजयी: हरीभाऊ कुंडलिक लोळे (भाजपा) – ११६३० मते.
​पराभूत: समीर अरविंद जाधव (शिवसेना) – ११०७३ मते.
​पुष्कराज संजय जाधव (राष्ट्रवादी)

​भिवडी गण विजयी: सायली मनोज शिंदे (भाजपा) – ६७९१ मते.
​पराभूत: पूजा सागर मोकाशी (शिवसेना) – ५९२० मते.
​अनुजा अमोल पोमण (राष्ट्रवादी)

​वीर गण विजयी: प्रवीण बाळासाहेब जगताप (शिवसेना) – ५९४० मते.
​प्रमुख पराभूत: सुधीर शिवाजीराव धुमाळ (भाजपा) – ५७९१ मते.
​उत्तम महादेव धुमाळ (राष्ट्रवादी)
​महेश चंद्रकांत धुमाळ (काँग्रेस)

​४. निरा – शिवतक्रार गट: राष्ट्रवादीची सरशी
​जिल्हा बँक अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या कन्या प्राजक्ता दुर्गाडे यांनी प्रतिष्ठा राखली.
​जिल्हा परिषद विजयी: प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे (राष्ट्रवादी) – १३५२१ मते.
​ पराभूत: भारती अतुल म्हस्के (शिवसेना) – ७८०३ मते.
​सीमा संदीप धायगुडे (भाजपा)
​सविता राजेंद्र बरकडे (काँग्रेस)

​कोळविहीरे गण विजयी: स्मिता संतोष निगडे (राष्ट्रवादी) – ५७२९ मते.
​पराभूत: शितल सतीश साळुंके (शिवसेना) – ४६६३ मते.
​सीमा भाग्यवान म्हस्के (भाजपा)
​रत्नमाला दिलीप खैरे (काँग्रेस)

​निरा – शिवतक्रार गण विजयी: मोनिका स्वप्नील कांबळे (राष्ट्रवादी) – ६१३६ मते.
​पराभूत: वंदना बाळासाहेब भोसले (भाजपा) – ३९६३ मते.
​रेखा नितीन केदारी (शिवसेना)
​गीता शुद्धोधन सोनवणे (काँग्रेस)
​पंचायत समितीत आता त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून, सत्तास्थापनेसाठी कोणाची कोणाला मदत मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment

You cannot copy content of this page