शिरदाळे गावात घडली दुर्दैवी घटना

Photo of author

By Sandhya

An unfortunate incident took place in Shirdale village.

गाव तळ्यात मासे पकडताना ठाकर समाजाच्या तरुणाचा बुडून मृत्यू…
घटनेची तीव्रता पाहता नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांची घटना स्थळाला भेट…
जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील आणि रामदास वळसे पाटील यांनी NDRF शी केला संपर्क…
आज शिरदाळे गाव तळ्यात एक दुर्दैवी घटना घडली.मासे पकडण्यासाठी आलेला आदिवासी ठाकर समाजाचा तरुण साहेबराव गजानन केसरी याचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला आहे.गेली अनेक वर्ष शिरदाळे नजीक असलेल्या ठाकर समाजातील अनेक लोक मासे पकडण्यासाठी तलावात येत असतात.आज देखील वरील व्यक्ती आपल्या जोडीदारासह आली होती यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आणि यात या तरुणाचा अंत झाला.
घटना घडल्यानंतर त्याची माहिती परिसरात पसरली,दुपारची वेळ असल्याने त्या ठिकाणी जास्त कोणी उपस्थित नव्हते परंतु जशी जशी माहिती पसरली तशी गर्दी वाढत गेली परंतु तळ्यात बुडालेला तरुण नक्की कुठे आहे याचा थांग पत्ता कोणाला नव्हता.पोलिस पाटील कल्पना चौधरी व निलेश भालेराव यांनी पारगाव पोलीस स्टेशनशी संपर्क करून घटनेची माहिती दिली.
तसेच मा.ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क करुण माहिती दिली.त्या ठिकाणावरून जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील आणि रामदास वळसे पाटील यांनी NDRF शी संपर्क केला. तर पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.पोलीस यंत्रणा देखील तातडीने लोहकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिकेसह घटनास्थळी हजर झाली.पहिल्यांदा एक ट्यूब च्या सहाय्याने दोन तीन तरुण पाण्यात गेले त्यात स्थानिक तरुण सचिन तांबे देखील होता परंतु त्यांना काही मिळाले नाही.त्यानंतर स्थानिक तरुणाच्या मदतीने एका रशीला हुक लावून शोध घेतला असता त्यात तो मृतदेख अडकला. त्याला बाहेर काढून सविच्छेदनासाठी मंचर या ठिकाणी नेण्यात आले.

पंचायत समीती सदस्या अंकिता वाळुंज यांनी दाखवली तत्परता
घटनेची माहिती कळताच नवीनच निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्या यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.तसेच केदारी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.एक तरुण अगदी २२ वर्षांची लोकप्रतिनिधी अंकिता वाळुंज यांनी दाखवलेल्या तत्परतेचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
शिरदाळे गावच्या तलावात प्रथमच अशी घटना घडल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. तर या वाईट घटनेत सर्व ग्रामस्थांनी या मदत कार्यात मोलाचे सहकार्य केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page