Baramati Municipal Council ranks first in ‘My Vasundhara 5.0’

माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये बारामती नगरपरिषद प्रथम; राज्यभर कौतुक
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी करत बारामती नगरपरिषदेनं राज्यस्तरीय “माझी वसुंधरा अभियान ५.०” मध्ये ४० हजार ते १ लाख लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित उपक्रमांत कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता आणि ऊर्जा बचतीसारख्या मोहिमांमध्ये बारामतीने प्रभावी कामगिरी केली. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झालं आहे.
या यशाबद्दल २१ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात बारामती नगरपरिषदेचा गौरव होणार आहे.
यापुढेही स्वच्छ सर्वेक्षण २०२६ मध्ये देशपातळीवर अव्वल येण्याचा संकल्प करत, नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.