२ मार्चला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वासापूजन व मातीपूजनाने कुस्ती परंपरेचा भव्य शुभारंभ

Photo of author

By Sandhya

On March 2, the grand inauguration of the wrestling tradition was held with Vasa Pujan and Mati Pujan by Union Minister of State Muralidhar Mohol.


‘महाराष्ट्र केसरी २०२६’ आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांचे कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने व रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित ६८ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा यंदा वाघोली येथे पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या शौर्य,परंपरा आणि संस्कारांचे प्रतीक असलेल्या कुस्ती परंपरेचा मंगल प्रारंभ येत्या २ मार्च रोजी वासापूजन व मातीपूजन या पवित्र विधींनी करण्यात येणार आहे. या सोहळ्यामुळे परिसरातील क्रीडा रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या सोमवारी (दि.२ मार्च) सकाळी १० वाजता केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्या हस्ते वासापूजन व मातीपूजन करून या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. आखाड्याच्या पवित्र मातीचे विधिवत पूजन करून कुस्ती परंपरेला अभिवादन करण्यात येणार असून, उपस्थित पैलवानांना प्रेरणा व नवी ऊर्जा मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रामकृष्ण सातव पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून,परिसरातील कुस्तीप्रेमी व क्रीडारसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वाघोलीतील मुख्य बाजारतळ मैदानावर होणार कुस्ती स्पर्धा:-
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने व रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित ६८ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा यंदा वाघोली येथे पार पडणार आहे. वाघोलीतील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव ही मानाची स्पर्धा गावातील मुख्य बाजारतळ मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रामकृष्ण सातव पाटील यांनी दिली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page