The work on the proposed new DP Road from Lokmat Office in Dhayari area to DP Road (Savitri Garden) will soon gain momentum.


या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. मार्गामध्ये काही नागरिकांच्या जागांचा समावेश होत असल्याने संबंधित कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः महिलांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
नागरिकांचा विश्वास आणि सहभाग यांना प्राधान्य देत, हा रस्ता पारदर्शक पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या पाहणीदरम्यान मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. शहर अभियंता पावसकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामाचा सविस्तर आढावा घेऊन नाट्यगृहाचे बांधकाम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी मा. सभासद राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, सोपान चव्हाण, कोमल नवले, जयश्री भूमकर, स्नेहलता कोल्हे व सर्व मा. पदाधिकारी उपस्थित होते