




Marathi should be compulsory in all medium, all management, and all language schools in the state, while the glory of Shivaji should be in the national curriculum!”; Statement of School Education Minister Shri. Dadaji Bhuse at the Vishwa Marathi Sammelan!”
“नाशिकची भूमी ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, तसेच ही भूमी थोर साहित्यिक आणि कलावंतांची खाण आहे. याच भूमीत कुसुमाग्रज, सावरकर आणि दादासाहेब फाळके यांच्यासारखी रत्ने घडली. ज्याप्रमाणे दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो, तसाच गेल्या तीन दिवसांपासून या ‘कविवर्य कुसुमाग्रज नगरीत’ मराठी भाषेचा ‘साहित्य कुंभ’ भरला आहे,” असे गौरवद्गार राज्याचे मंत्री श्री. दादाजी भुसे यांनी काढले.
केटीएचएम महाविद्यालय (KTHM) प्रांगणात आयोजित ४ थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात ते बोलत होते. मा. न्या. भूषण गवई, निवृत्त सरन्यायाधीश,मा. ना. प्रा. श्री. राम शिंदे, सभापती,मा. ना. ॲड. राहुल नार्वेकर, अध्यक्ष,मा. भिकल्या लाडक्या धिंडा, तारपा वादक, पद्मश्री पुरस्कार विजेते
मा. अजय गोगावले, संगीतकार,
मा. अतुल गोगावले, संगीतकार (विश्व मराठी संमेलन कलारत्न पुरस्कार)
मा. विकास शिंदे, उपमहापौर,मा. ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, म. वि. प्र. मंडळ,मा. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव – मराठी भाषा विभाग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिक्षणमंत्री श्री.भुसे यांनी यावेळी मराठी भाषेचे संवर्धन आणि शालेय शिक्षणातील बदल यावर अत्यंत प्रभावी भाष्य केले.
आपल्या भाषणात दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या आणि सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. “मराठी ही केवळ भाषा नसून ती आपली संस्कृती आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमाची शाळा असली तरी तिथे मराठीचे धडे गिरवले गेलेच पाहिजेत, असा ठाम निर्धार शासनाने केला आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, राष्ट्रगीतानंतर आता राज्यगीताचे (जय जय महाराष्ट्र माझा) गायन करणेही सन्मानाने बंधनकारक केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णयाची माहिती देताना भुसे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशपातळीवर पोहोचला आहे. इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात 'The Rise of Marathas' या तिसऱ्या प्रकरणात २१ पानांचा विस्तृत इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे."
‘
भाषणाचा शेवट करताना श्री . भुसे यांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या अजरामर ओळींची आठवण करून दिली. कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!’ हाच आत्मविश्वास आणि मराठीचा स्वाभिमान घेऊन आपण आपली भाषा सातासमुद्रापार नेऊया., असे आवाहन करून श्री भुसे यांनी या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले आणि उपस्थित साहित्यप्रेमींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.