कापूरहोळ मधून व्यापाऱ्याच्या मुलाचे भरदिवसा अपहरण;नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका

Photo of author

By Sandhya

Businessman’s son kidnapped in broad daylight from Kapurhol;
Safely rescued during surgical blockade by Neera police

पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ (ता.भोर) मध्ये मंगळवारी दुपारी घडलेल्या एका थरारक अपहरणप्रकरणाने संपूर्ण परिसराला अक्षरशः हादरवून सोडलं. एका नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाला भरदिवसा काळ्या XUVमधून जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं आणि काही क्षणांत गावात भीतीचं सावट दाटून आलं. पण काही तासांतच पोलिसांनी उभारलेल्या ‘सर्जिकल नाकाबंदी’मुळे चित्र पालटलं—आणि युवकाची सुखरूप सुटका झाली.

कापूरव्होळ मधून काळया रंगाच्या स्कोडा गाडीतून अपहरण झालेल्या तरुणाला पळवून नेले जात असून मांडकी मार्गे ही गाडी जात असल्याचे जेजुरी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी तात्काळ नीरा पोलीस स्टेशनला सूचना देवून या परिसरात नाकेबंदी करण्यात आली.
काही वेळात ब्लक रंगाची गाडी येताच पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला . व या गाडीचा पाठलाग सुरू केला.
काही अंतरावर ब्लॅक रंगाच्या गादिच्या चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी उसाच्या शेतात घुसली, चीखला मुळे गाडी बाहेर काढता न आल्याने गाडीतील पाच जण अपहरण झालेल्या तरुणाला तिथेच सोडून पळून गेले.
दरम्यान पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाला सुखरूप ताब्यात घेतले.
जेजुरी नीरा पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेवून
अक्षय लक्ष्मण इंगुळकर, अक्षय दत्तात्रय भालेराव मांजरी हडपसर आरोपी डोंगरात पकडले. तर पंकज वाल्हेकर,गणेश धाडवे,राहणार कामथडी हे फरार झाले असून पोलीस पथके या आरोपींचा शोध घेत आहेत.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे तसेच निरा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक कोकरे व पोलीस हवालदार कोळेकर यांनी दाखवलेल्या धाडसा मुळे अपहरण झालेला तरुण सुखरूप मिळाला आणि दोघा आरोपींना जेरबंद करण्यात आल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे
या अपहरणामागे नेमकं कारण काय?

खंडणीचा डाव होता का?

आर्थिक व्यवहारातील वाद?

की वैयक्तिक वैरातून रचलेला कट?

या सर्व शक्यतांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. संशयित वाहनाच्या तपासातून आणि तांत्रिक पुराव्यांमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page