जेजुरी गडावर पर्यावरण पूरक नैसर्गिक रंगाची रंगपंचमी साजरी. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Photo of author

By Sandhya

Rangpanchami celebrated with eco-friendly natural colors at Jejuri Fort. The Rangpanchami festival of Khandoba, the ancestral deity of Maharashtra, was celebrated with great enthusiasm at Jejuri Fort.

पहाटेची पूजा झाल्यानंतर श्री मार्तंड देवसंस्थान,मेघ मल्हार प्रतिष्ठानचे सचिन उपाध्ये गुरुजी तसेच पुजारी सेवक वर्ग व नित्य सेवेकरी यांच्या वतीने श्री मार्तंड भैरवाला रंग लावण्यात आला व सर्व मूर्तींवर रंगाचे शिंपण करण्यात आले. तसेच जेजुरी गडकोटातील इतर देवी देवतांना रंग लावण्यात आला .
पर्यावरण पूरक व नैसर्गिक रंगाची उधळण यावेळी करण्यात आली.
यावेळी रंगाची सजावट कलाकार रियाज पानसरे,आशा खुडे,आपाजी जाधव,सूर्यकांत नेवसे,जयकुमार चौंडकर आदींनी केली.

श्री मार्तंड देव संस्थांनचे विश्वस्त ,समस्त ग्रामस्थ अधिकारी व कर्मचारी या रंगपंचमी उत्साहात सहभागी झाले होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page