पुणे–सोलापूर महामार्गावरील अपघात थांबेना; उरुळी कांचन उरूसावरून परतणाऱ्या व्यक्तीचा बल्करच्या धडकेत जागीच मृत्यू

Photo of author

By Sandhya

Accidents on Pune-Solapur highway continue; A person returning from Uruli Kanchan Urusa died on the spot after being hit by a bulk carrier

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुरू असलेल्या काळभैरवनाथाच्या उरूसाला गेलेल्या एका व्यक्तीचा महामार्ग ओलांडताना भरधाव बल्करच्या धडकेत चिरडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (८ मार्च) रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम बबन भंडारे (वय ५३ वर्ष) सध्या रा. शिंदवणे रोड उरुळी कांचन, मुळगाव नाशिक, हे उरुळी कांचन येथे सुरू असलेल्या उरूसाला गेले होते. उरूसावरून परत घरी जात असताना त्यांनी पुणे–सोलापूर महामार्गावरील शिंदवणे चौक येथे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सोलापूर वरून पुण्याच्या च्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या बल्कर (क्र. MH-12 SX 8985) ने त्यांना जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बल्करचा टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन कुटुंबासमोरच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पो हवा सचिन जगताप, प्रवीण चौधर घटनास्थळी दाखल झाले. अपघात करून फरार झालेल्या बल्करचा पाठलाग करून चालक प्रणव प्रदीप शिंदे (वय २०) याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

आठवडाभरात तिसरा बळी
धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या सात दिवसांत उरुळी कांचन परिसरात झालेल्या अपघातांमध्ये तीन जणांचा बळी गेला आहे. सोरतापवाडी ग्रा. हद्दीत एका पुरुषाचा अपघातात जागीच मृत्यू, चंदनवाडी फाटा येथे ७० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू, आणि आता शिंदवणे चौकात उरूसावरून परतणाऱ्या व्यक्तीचा डोक्याचा चेंदामेंदा होऊन मृत्यू, यामुळे पुणे–सोलापूर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
शाळा सुटण्याच्या वेळेस महामार्गावरील शिंदवणे चौक आणि ए-लाईट चौक ओलांडून जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. या वेळी वाहनांचा वेग प्रचंड असतो. रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून धाव घ्यावी लागत असल्याचे पालकांनी सांगितले.

वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस नेमले असतानाही अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “वाहतूक नियंत्रीत ठेवण्यासाठी नेमलेले पोलीस नेमके करतात तरी काय?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
अपघाताचे धोकादायक चौक-
स्वरगंधार समोरील चौक, पोलीस स्टेशन समोरील चौक,
प्रयागधाम चौक, सहजपुर फाटा ते नायगाव फाटा हा सुमारे सात किलोमीटरचा पट्टा अपघातांचा हॉटस्पॉट बनला असून अनेकांचे जीव गेले, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी?
उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्याच ठिकाणी सतत अपघात होत असल्याने प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसर अपघातांचा केंद्रबिंदू बनत चालला असून रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी पोलीस तैनात करणे, सिग्नल व्यवस्था, स्पीड नियंत्रण, दर्शक फलक, आणि सुरक्षित पादचारी मार्ग यांसारख्या ठोस उपाययोजना तातडीने करण्याची नागरिकांची मागणी

Leave a Comment

You cannot copy content of this page