Rs 15 lakh stolen from hospital drawer in Baramati

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,पोलीस प्रशासनाचे खबरदारी घेण्याचे आवाहन
बारामती – बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 13/03/2026 रोजी सकाळी सुमारे 06.20 वा.च्या सुमारास भिगवण रोड,संघवी टाऊनशिप येथे असलेल्या “प्रिझ्मा आय केअर” हॉस्पिटलमध्ये अज्ञात इसमाने मुख्य दरवाजाच्या लॉकजवळील ग्रॅनाईट चौकट तोडून आत प्रवेश करून हॉस्पिटल मधील ड्रॉवर उचकटून ₹15,00,000/- (पंधरा लाख रुपये) रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.संहिता कलम 331(3), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलीसांकडून तपास सुरू आहे.सदर घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेज तपासणे,तांत्रिक तपास व विशेष पथकाद्वारे शोधमोहीम राबविण्यात येत आहे.सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील सर्व नागरिक,व्यापारी,हॉस्पिटल,क्लिनिक,दुकानदार व व्यावसायिकांनी खालील बाबींची खबरदारी घ्यावी, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.
नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी
- व्यवसायिकांनी शक्यतो मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कार्यालय / दुकानात ठेवू नये.
- परिसरात सक्षम CCTV कॅमेरे बसवून ते कार्यरत ठेवावेत.
- दुकान,कार्यालय, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी सुरक्षित लॉकिंग सिस्टीम व अलार्म सिस्टीम वापरावी.
- रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक (Watchman) ठेवण्याची व्यवस्था करावी.
- संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे.
- शेजारील व्यापाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून परिसरावर लक्ष ठेवावे.
बारामती शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन