विधानभवनाबाहेर एका व्यक्तीकडून अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आंदोलनाचा प्रयत्न

Photo of author

By Sandhya

An attempt to protest by pouring flammable liquid on oneself outside the Vidhan Bhavan by a person

पोलिसांनी प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीला रोखले आणि ताब्यात घेतले.

राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच आज विधानभवन परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने हालचाल करत या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही व्यक्ती अचानक आली आणि तिने सोबत आणलेले द्रव्य स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या या व्यक्तीला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तत्परता दाखवत त्या व्यक्तीला वेळीच पकडले आणि अनुचित प्रकार रोखला.

Leave a Comment

You cannot copy content of this page