Focus should be placed on green energy and solid waste management for environmental conservation – Hanumant Patil MIDC held a seminar on artificial intelligence, solid waste management, green energy

Photo of author

By Sandhya

पर्यावरण संवर्धनादृष्टीने हरित ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनावर भर द्यावा-हनुमंत पाटील एमआयडीसीच्यावतीने कृत्रिम बुद्धिमत्ता, घनकचरा व्यवस्थापन, हरित ऊर्जा विषयावर चर्चासत्र संपन्न

बारामती, दि.१: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती कार्यक्षेत्रात असलेल्या कंपन्यानी कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा प्रभावीपणे वापर करावा, उच्च व गुणवत्तापूर्ण उत्पादनासोबतच पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्यादृष्टीने हरित ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत काम करावे, असे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले.

एमआयडीसी बारामती कार्यालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कुरकुंभ येथील सिपला कंपनीच्या सभागृह येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, घन कचरा व्यवस्थापन आणि हरित ऊर्जा’ या विषयावर नुकताच आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
यावेळी बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार,बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी,बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, स्वयमऊर्जाचे राहुल नलवडे, ग्रीनस्पार्क वेंचुर्सचे दर्युस छापखानवाला, प्रोकलिन टेक्नॉलॉजीजचे अलोक गोयल,
राजयोग एआय इंडस्ट्रीचे नवनाथ काळे, कार्यकारी अभियंता विजय पेटकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. कंपन्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात हरित प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापनातील सुधारणा आणि ऊर्जा बचती संदर्भातील उपक्रम राबविण्यावर भर द्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी सूचना केल्या. या सूचना विचारात घेता एमआयडीसीच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page