पावसामुळे उद्भवलेली  परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

Photo of author

By Sandhya

अवकाळी पावसाने सलग दोन दिवस पुणेकरांना झोडपले असून एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पावसाचा तब्बल 130 वर्षांचा विक्रम या दोन दिवसाच्या पावसाने मोडून काढला आहे. यामुळे घडलेल्या झाडपडीसारख्या, रस्त्यावर पाणी साचणे आणि ड्रेनेज तुंबण्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. रस्त्यांना ओढ्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. कचराकुंड्यांमध्ये पाणी जाऊन कचऱ्याचा चिखल झाला. ही निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी खुद्द उपमहापौर परशुराम वाडेकर रस्त्यावर उतरले.

कमी कालावधीमध्ये जोरदार वाऱ्यांसह शहरात वादळी पाऊस झाला. तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडले. या विषयीच्या अनेक तक्रारी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे येवू लागल्या. या परिस्थितीत वेगाने कामे करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून महापालिकेचा उद्यान विभाग, सफाई कर्मचारी यांना सूचना देवून यांच्यामार्फत वेगाने कामे मार्गी लावली.

या विषयी माहिती देताना वाडेकर म्हणाले, या पावसामुळे ज्या ठिकाणी ड्रेनेज तुंबळे, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठणे असे प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहेत. तसेच घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडले अशा सर्व ठिकाणांची नोंद घेण्यात आली असून या पुढील पावसाळ्यात किंवा अवकाळी पावसाच्या वेळी नागरिकांना पुन्हा या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, असे वाडेकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, बोपोडी परिसरातील पठाण चाळ बोपोडी 53, 54 हायवे जवळील वसाहत, बोपोडी सर्वे क्रमांक 26 येथील तक्रारी काढून घेण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणाचा कचरा काढून घेण्यात आला आहे. त्यामध्ये मटन मार्केट, दूध भट्टी, मारुती मंदिर परिसर व औंध रोड परिसरात असे अनेक ठिकाणी मधील कचरा काढून स्वच्छ करून घेण्यात आले.असेही वाडेकर यांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page