Women gained strength through the compassion of Sunetra Vahini..!

Photo of author

By Sandhya

सुनेत्रावहिनींच्या कनवाळूपणाने महिलांना मिळाले बळ..!

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांना विजयी करण्यासाठी अफाट निर्धाराचे अक्षरशः वादळ घोंगावत आहे.

बारामती मतदारसंघातील जनता २३ तारखेला “विक्रमी” मतदान करुन “मताधिक्याचा महाविक्रम” करण्यास सज्ज आहेच. शिवाय, बारामतीतील आपल्या पै पाहुण्यांना, मित्र मंडळींना भेटण्यासाठी इतर ठिकाणाहून देखील अनेकजण कर्तव्यभावनेने बारामती मतदारसंघात येत आहेत.

पुण्याहून आलेल्या काही महिलांनी अशाच प्रकारे आपल्या स्नेहिजनांच्या भेटी गाठी घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची भेट घेतली.

वास्तविक त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार बाहेर निघाल्या होत्या. परंतु या महिलांसह इतरही अनेकजणांना पाहून त्या गाडीतून उतरल्या. जनतेची निवेदने स्वीकारली, या महिलांची देखील भेट घेतली. “उन्हाची कशाला एवढी धावाधाव केली? काळजी घ्या”, असे आपुलकीने सांगत सर्वांची विचारपूस केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचा हा कनवाळूपना या महिलांना बळ देणारा ठरला.

वहिनींची ही भेट आम्हाला आनंद आणि ऊर्जा देणारी आहे, अशी भावना या सर्वजणींनी व्यक्त केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page