Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar will speed up the work of Jain Minority Economic Development Corporation

Photo of author

By Sandhya

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाला गती देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे काम अधिक वेगाने व परिणामकारक करण्यासाठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नेमण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे तातडीने परीक्षण करून पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
महामंडळाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत, जैन समाजाच्या सर्व घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. जैन तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध मंडळावर प्रलंबित अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची ग्वाही देत, महामंडळाच्या कामासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page