Khandoba Devasthan’s initiative in the spirit of Ashtagandha Ooty Fruit Festival in Dhamani: A picturesque display of fragrant flowers

Photo of author

By Sandhya

धामणीत अष्टगंधउटी फळ महोत्सव उत्साहात खंडोबा देवस्थानाचा उपक्रम: सुगंधी फुलाची नयनरम्य आरास

मंचर : धामणी(तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा.म्हाळसाई.व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्यांचा वासंतिक अष्टगंधउटी व फळ महोत्सव उत्साहात शुक्रवारी(१मे२६) साजरा झाला.वैशाख पौर्णिमा व बुध्द पौर्णिमेनिमित्त पारंपारिक अष्टगंधउटी सोहळ्यासाठी झेंडू.अष्टर.गुलाब.मोगरा आणि शुध्द अष्टगंधाचा वापर करण्यात आला. वाढत्या उन्हापासून देवाला थंडावा मिळावा,या भावनेतून स्वयंभू सप्तशिवलिंगाला व मुखवट्यांना अष्टगंधाचा लेप लावून गाभार्‍यात सुगंधी फुलांची व फळांची आरास करण्यात आली होती. यामुळे अवघे मंदिर परिसर भक्तिने आणि सुगंधाने न्हाऊन निघाले होते. होते.बुध्द पौर्णिमेच्या मुहर्तावर शुक्रवारी (१मे२६) शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने खंडेरायाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगावर सरत्या चैञ व वैशाख महिण्यातील वसंत व ग्रीष्म ॠतुतील चौथी वासंतिक अष्टगंधउटी साकारण्यात आली.खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या व स्वयंभू सप्तशिवलिंगावर साकारलेल्या अष्टगंधटीचे मनमोहक रुप पाहाण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.तत्पूर्वी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद झाला.त्यानंतर नवनाथ जाधव व संध्या जाधव.विठ्ठल जाधव व मंगल जाधव.अरुण बोर्‍हाडे व संगिता बोर्‍हाडे,सतीष तांबे व सुनिता तांबे.सिताराम जाधव व शितल जाधव,राहूल बढेकर व मनिषा बढेकर.शिवाजी जाधव व नंदा जाधव,राजेश भगत व सारिका भगत,गणेश ससाणे व शिल्पा ससाणे,अजिंक्य जाधव व शितल जाधव,अशोक जाधव व मनिषा जाधव या अकरा जोडप्यांच्या हस्ते वसंत पूजा व दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला.खंडेराय म्हाळसाई बाणाई व जोगेश्वरीच्या देखण्या मूर्तीना वस्रालंकार व सुंगधी फुलांचे हार घालण्यात आल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी प्रभाकर भगत.दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.नामदेव भगत.पांडुरंग भगत.धोंडीबा भगत.अनिरुध्द वाळूंज. बाळशिराम साळगट यांच्याकडून स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यावर सुवासिक केशर व सुंगधी दवण्याचे अत्तरमिश्रित अष्टगंध उटीचा लेप देण्यात आला.त्यानंतर खंडेरायाला नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.सुवासिक अष्टगंधाचे लेपन करत असताना मंदिराच्या आवारात पारंपारिक वाद्याच्या सनईतून मंगलमय स्वरात भक्तिमय भैरवी गायल्या जात होत्या.पौर्णिमेच्या अभिषेकाचे पौरोहित्य मुकुंद क्षिरसागर यांनी केले. वसंत ॠतुच्या उष्म्याची दाहकता कमी करण्यासाठी मंदिराच्या गाभार्‍यात व सभामंडपात झेंडू.गुलाब.अष्टरच्या फुलांची सजावट धामणी येथील भाविक विमल पांडुरंग ससाणे व गणेश ससाणे यांच्या तर मंदिराच्या गाभार्‍यात व सभामंडपात आकर्षक विद्युत रोषणाई गुरुकृपा स्पिकरचे प्रथमेश विधाटे.व योगेश विधाटे यांच्या सौजन्याने करण्यात आली.मंदिराचे आवारात व सभोवताली भल्या पहाटे महिला भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या.पहाटे मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाला अष्टगंधीची उटी लेपन केल्यानंतर उपस्थित भाविकांच्या कपाळाला अष्टगंध व भंडारा लावण्यात आला.वासंतिक अष्टगंधउटी सोहळ्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.वासंतिक अष्टगंधाच्या उटीने उन्हाचा दाह आणि हरीनामाच्या भजनाने आत्मीक शितलता निर्माण होण्यास मदत होते असे यावेळी भाविकांनी सांगितले.वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी पुणे.नगर.नाशिक मुंबई.भोसरी.पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील भाविक व नवविवाहीत जोडपी कुटुंबियासह आलेले दिसत होते.मंदिराच्या जागरण मंडपात पांच नामाची जागरणाचे घट मांडून वाघे व वीर मंडळी जागरणे करताना दिसत होती .

Leave a Comment

You cannot copy content of this page