Youth from Diksal injured in electric shock

Photo of author

By Sandhya

विजेच्या धक्क्याने डिकसळ येथील तरुण जखमी

भिगवण: इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे शेतात काम करत असताना तरुणांना विजेचा धक्का बसल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत सूर्यकांत विठ्ठल हगारे असे या तरुणाचे नाव आहे. हगारे हे आपला मुलगा स्वरूप सूर्यकांत हगारे यांच्या समवेत नेहमीप्रमाणे शनिवार ( ता.२) रोजी सकाळी शेतात काम करत होते. यावेळी शेतातील बांधावरून जाणाऱ्या विजेच्या खांबाला दिल्या जाणाऱ्या तान तारेला विद्युत प्रवाह चालू होता. यावेळेस शेतातील काम करताना चुकून सूर्यकांत हगारे यांच्या हाताचा स्पर्श त्या ताण तारेला होताच विद्युत शक्तीने त्यांना खेचून घेतले. दरम्यानच्या काळात एक मिनिट विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतात काम करणाऱ्या महिलांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने ताण तारेपासून दूर केले विजेच्या धक्क्याने बेशुद्ध अवस्थेत सूर्यकांत हगारे यांना खाजगी वाहनाने भिगवण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. सूर्यकांत हगारे हे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे बारामती प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची संपर्क केला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याची टाळले.

Leave a Comment

You cannot copy content of this page